‘टक्केवारीचे गणित जुळत नसल्याने लसींचे टेंडर रखडले ‘, भाजपचा ‘ठाकरे’ सरकारवर निशाणा

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा(Corona) पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळत आहे.राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेलीदिसून येत आहे. त्यामुळे राज्यात लसीकरणावर भर देण्याचा निर्णय ‘ठाकरे’ सरकारने (Thackeray Govt)घेतला आहे. मात्र मुंबईसारख्या शहरात लसीकरण केंद्रावर लशींचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने मोठा गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. एकीकडे राज्य सरकारने विदेशातून लशींची आयात करण्याचा निर्णय घेतला असला तरी पुढची प्रक्रिया खोळंबली आहे. अजूनही टेंडरची प्रक्रिया रखडलेली आहे. आणि याच मुद्द्यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट करत ‘ठाकरे’ सरकारवर निशाणा साधला.

‘राज्य सरकार टक्केवारीचे गणित न जुळल्यामुळे लसींचे टेंडर काढत नाही आणि टक्केवारीत वाटेकरी नको म्हणून महापालिकेला ही लस थेट खरेदी करू देत नाही. लसींचा तुटवडा असताना महानगर पालिका मात्र सवंग लोकप्रियतेसाठी रोज नवीन लसीकरण केंद्रांचे उद्घाटन करत आहे, असा खरमरीत टोला भातखळकर यांनी ‘ठाकरे’ सरकारवर (BJP targets Thackeray government) लगावला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button