महाराष्ट्रासह इतर राज्यातही लसीकरणर ठप्प, लसीसाठीचा कच्चा माल अमेरिका, युरोपनं थांबवला

Maharashtra Today

नवी दिल्ली :- एकीकडे कोरोना (Corona) विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दुसरीकडे महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचा आरोप गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारकडून केला जात आहे. मात्र हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रासह भारतातील इतर राज्यातही कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. या राज्यांकडून सातत्याने केंद्राकडे कोरोना लसींचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर करण्याची मागणी केली जात आहे. लसींच्या अभावी महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीकरण मोहीम ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातील कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे केंद्र विरुद्ध राज्य असा वाद रंगला आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांकडून केंद्राला कोरोना लसींच्या पुरवठ्याबाबत मागणी केली जात आहे. तसेच आरोप-प्रत्यारोपही होताना दिसत आहेत. महाराष्ट्रासह दिल्ली, तेलंगण, ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा जाणवू लागल्याने आता लसीकरण मोहीम थांबवण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.(Vaccine shortage in other states including Maharashtra, raw material for vaccine stopped by US, Europe)

दिल्लीतील कोरोना लसीकरण योग्य दिशेने सुरू आहे. मात्र, दिल्लीत केवळ चार दिवस पुरेल, एवढाच लसींचा साठा शिल्लक राहिला आहे. पर्याप्त लसीकरणासाठी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दोनवेळा केंद्राला पत्र पाठवल्याची माहिती मिळाली आहे. तर, दुसरीकडे आंध्र प्रदेशमध्ये केवळ तीन लाख लसींचे डोस उपलब्ध असून, फक्त दोन दिवस पुरेल, इतका लस साठा आहे. लसी उपलब्ध न झाल्यास लसीकरण केंद्र बंद करून मोहीम थांबवावी लागेल, असे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी म्हटले आहे.

कोरोना लसीच्या कमतरतेमुळे ओडिशामधील १४०० पैकी तब्बल ७०० लसीकरण केंद्र बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील अनेक ठिकाणची कोरोना लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. राज्यात केवळ दोन दिवसांपुरताच कोरोना लसींचा साठा उपलब्ध आहे. कोरोना लसींचा पुरवठा झाला नाही, तर राज्यातील कोरोना लसीकरण ठप्प होईल, अशी शक्यता आरोग्यमंत्री नब किशोर दास यांनी वर्तवली आहे.

दरम्यान, करोनासाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र, आता लसीचा तुटवडा हा नवा चर्चेचा आणि राजकारणाचा विषय ठरला आहे. त्यात आता करोना लसीच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा देखील तुटवडा जाणवू लागल्याचं समोर आलं आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार कोविशिल्ड या करोना लसीचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावाला यांनी ही माहिती दिली आहे. अमेरिका आणि युरोपमधून करोना लसीसाठी लागणारा कच्चा माल येतो. मात्र, त्यांनी त्याचा पुरवठा थांबवल्यामुळे सीरम इन्स्टिट्युटला कच्चा माल मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असं अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे. त्यामुळे देशातील करोना लस निर्मितीचा वेग मंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आम्हाला लसीसाठी महत्त्वाचा असलेला कच्चा माल आत्ता हवा आहे. ६ महिने किंवा वर्षभरानंतर आम्हाला त्याची आवश्यकता नसेल. कारण तोपर्यंत आम्ही दुसऱ्या पुरवठादाराकडून तो माल मिळवण्याची व्यवस्था केली असेल. पण आत्ता या घडीला आम्हाला अमेरिका आणि युरोपकडून येणाऱ्या कच्च्या मालाची आवश्यकता आहे, असं पूनावाला यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, चीनकडून लसीसाठीचा कच्चा माल घेण्याच्या पर्यायाचा सीरम विचार करत नसल्याचं अदर पूनावाला यांनी स्पष्ट केलं आहे. चीनकडून येणाऱ्या मालाचा दर्जा आणि पुरवठ्यासंदर्भातले निर्बंध याचा विचार करता तो पर्याय विचारात घेतला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button