घरोघरी नाही तर वस्त्यांमध्ये जाऊन लसीकरण होणार; किशोरी पेडणेकरांची माहिती

kishori pednekar - Maharastra Today
kishori pednekar - Maharastra Today

मुंबई : राज्यात कोरोना लसीकरण साठा जसा उपलब्ध आहे, त्याप्रमाणे लस दिली जात आहे. लस केंद्रावर उपलब्ध आहे की नाही, याची माहिती घेऊनच लस घेण्यात यावे. घरोघरी जाऊन लस देण्याचा मुंबई पालिकेचा सध्या तरी विचार नाही. मात्र, वस्तीपातळीवर जाऊन लस देण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

मुंबईत ३० कोरोना लसीकरण केंद्रे आहेत. ६० खासगी ठिकाणी लसीकरण दिले जात आहे. सध्या दुसऱ्या कोरोना डोसला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. येत्या १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांना लस दिली जाणार आहे. खासगी रुग्णालयातही लसीकरण केले जात आहे, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

“केंद्राने दिलेल्या अ‍ॅपमध्ये नोंदणी करून लस दिली जाणार आहे. त्यामुळे सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. केंद्राने दिलेल्या सूचना पाळून लसीकरण करत आहोत. दर दिवसाला १ लाख लस देण्याचा प्रयत्न सुरू आहेत. कोवॅक्सीन दोन दिवसात मुबलक प्रमाणात येतील. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. याचे श्रेय डॉक्टर आणि नर्स यांना जाते. दुकानामध्ये जी गर्दी होत आहे. दुकानदारांनी आणि ग्राहकांनी काळजी घेतली पाहिजे. पोलीसदेखील योग्य काम करत आहे. तसेच मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सकारात्मक चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसात लसीचा कोणताही तुटवडा जाणवणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीचा मोठा साठा उपलब्ध करून दिला. मी त्यांचे आभार मानते.” असे महापौर पेडणेकर म्हणाल्या.

“जिथे गर्दी होत आहे, तिथे गर्दी कमी व्हावी ही अपेक्षा आहे. दुकानदारांनी स्वयंसेवक नेमावे आणि काम करावे. राज्य सरकार जो निर्णय घेतील तो सर्वांच्या हिताचा आहे. कोरोनाच रूप गडद आहे. लस ही सर्वांना द्यायची आहे. एकही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहता कामा नये.” असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button