
कोल्हापूर :- कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या चाचणीला कोल्हापुरात काल, मंगळवारी सुरुवात झाली. ७७ वर्षीय निवृत्त लष्करी जवानास प्रथम लस देण्यात आली. दिवसभरात २१ स्वयंसेवकांना लस देण्यात आली. लसीनंतर खबरदारी म्हणून स्वयंसेवकांना निरीक्षणाखाली राहावे लागणार आहे. लस घेतलेल्या स्वयंसेवकांना कोणाताही साईड इफेक्ट जाणवला नसल्याचे डॉक्टरनी सांगितले.
३१डिसेंबरपर्यंत एक हजार जणांना लस देण्याचे उद्दिष्ट असून, अवघ्या ३० मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण होते. यानंतर स्वयंसेवकांना कोणतेही पथ्य पाळण्याची गरज नाही. कोव्हॅक्सिन लसीनंतर खबरदारी म्हणून स्वयंसेवकांना निरीक्षणाखाली राहावे लागणार आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीस कोव्हॅक्सिन लस घेता येणार आहे. तसेच शुगर, रक्तदाब यांसह अन्य व्याधीग्रस्तही लस घेऊ शकतात.
लस घेण्यापूर्वी संबंधित स्वयंसेवकाकडून संमतीपत्र लिहून घेतले जाते. त्याने काही शंका उपस्थित केल्यास त्याचे निरसन केले जाते. यानंतर संबंधिताचे रक्त व स्वॅब तपासणीसाठी घेतला जातो. यानंतर त्याला पहिला डोस दिला जातो. पुन्हा चार दिवसांनी दुसरा बूस्टर डोस दिला जातो. कोव्हेॅक्सिन ही लस हैदराबादस्थित भारत बायोटेकने बनवली आहे. या लस निर्मितीमध्ये भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था (आयसीएमआर) व राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था पुणे (एनआयव्ही) यांचे योगदान लाभले आहे.
ही बातमी पण वाचा : कोरोना विषाणूचे नवे रूप सुपर स्प्रेडर मात्र जीवाला धोका कमी
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला