20 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोंना प्रतिबंधक लस

Coronavirus Vaccine

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस नव्या वर्षात उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय आणि खासगी अशा 20 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. लसीकरण करण्यात येणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांची आकडेवारी प्रशासनाने राज्य शासनाला सादर केली आहे. या सर्वांना जानेवारीत ही लस देण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यानुसार प्रशासनाचे नियोजन सुरू आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. मात्र, कोरोना फैलाव पूर्णपणे थांबला आहे, अशी परिस्थिती नाही. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून अजूनही खबरदारी घेण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वेगाने वर गेला होता. ऑक्टोबर महिन्यात त्याची गती कमी झाली. दररोज सरासरी सातशे ते हजारच्या पटीत आढळणारे रुग्ण आणि दैनंदिन 20 ते 25 मृत्यू, असे दोन महिन्यांपूर्वी असणारे चित्र आता मात्र दिसत नाही.

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती सध्या नियंत्रणाखाली असली, तरी धोका अजिबात पूर्णपणे टळलेला नाही. यामुळे भविष्यात रुग्णवाढीच्या शक्यतेने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून कोरोनाची लस उपलब्ध होताच ती प्रथम कोरोनाशी संबंधित आरोग्य यंत्रणेत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER