अभिनेत्रीसह १५ जणांचे बनावट ओळखपत्रावर लसीकरण; कारवाईचे आदेश

Fake Identity Card - Coronavirus Vaccination

ठाणे :- अभिनेत्री मीरा चोप्रा (Meera Chopra) हिच्यासह २५ जणांना बनावट ओळखपत्र बनवून देऊन त्यापैकी १५ जणांना लस देण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्याचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करा, असे आदेश स्थायी समिती सभापती संजय भोईर (Sanjay Bhoir) यांनी दिले.

ठाणे महापालिका (Thane Municipal Corporation) क्षेत्रामध्ये १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण बंद आहे. तरीही महापालिकेच्या पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रावर अभिनेत्री मीरा चोप्रा हिने लसीची पहिली मात्रा घेतली. पालिकेच्या पार्किंग प्लाझा करोना रुग्णालयामध्ये पर्यवेक्षक असल्याचे बनावट ओळखपत्र तयार करून त्याद्वारे तिचे लसीकरण करण्यात आले होते.

या प्रकरणाचा चौकशी अहवाल आरोग्य विभागाचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांनी नुकताच आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे सादर केला. त्यामध्ये आणखी २५ जणांना बनावट ओळखपत्र बनवून देऊन त्यापैकी १५ जणांना लस देण्यात आल्याचे उघड झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button