मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्णयामुळे मोठा घोळ; केंद्रावर लस असूनही लसीकरण ठप्प!

vaccination is stopped - Maharashtra Today
vaccination is stopped - Maharashtra Today

मुंबई : मुंबईतील बड्या बड्या लसीकरण केंद्रांवरील लसींचा  साठा संपला आहे, अशा   बातम्या मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्ये झळकत होत्या. मात्र आता लसींचा  साठा असूनही पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर  एक वेगळा गोंधळ बघायला मिळाला. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी केवळ नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लसीकरण केले जाईल,असा निर्णय  काल जाहीर केला. याबाबतचे परिपत्रक काढून हे परिपत्रक सर्व लसीकरण केंद्रांना पाठवण्यात आले आहे.‌ त्यामुळे आज मोठ्या लसीकरण केंद्राच्या बाहेरची गर्दी संपलेली तर छोट्या लसीकरण केंद्रांवर मात्र मोठी गर्दी झाल्याचे बघायला मिळाले.

मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील शिरोडकर प्रसूतिगृह येथे सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर आज लस आहे; पण लसीकरण मोहीम ठप्प पडल्याचे दिसून आले. कारण लसीकरणासाठी नागरिक या केंद्रावर येत होते. त्यांना देण्यात येणारी लससुद्धा केंद्रावर उपलब्ध होती; पण नागरिकांनी नोंदणी केलेली नव्हती. त्यामुळे  तीन नागरिकांना लस दिली गेली नाही. लसीची एक कुपी तोडली तर त्यामध्ये १० जणांचे लसीकरण करावे लागते.‌ ते झाले नाही तर थोड्या वेळात उर्वरित डोस वाया जातात. त्यामुळे तीन नागरिकांसाठी कुपी तोडली जाऊ शकत नाही अशी माहिती स्थानिक महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.‌ आपल्याकडे लसीचे ५० डोस उपलब्ध आहेत; परंतु नोंदणी केलेले किमान १० नागरिक जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लसीकरण सुरू करता येणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

दुसरीकडे भाजपचे स्थानिक नगरसेवक अभिजित सामंत यांनी काढण्यात आलेल्या परिपत्रकावर नाराजी व्यक्त करत त्यात बदल करण्याची मागणी केलेली आहे. कारण या केंद्रावर त्यांनी काल नियोजनबद्ध पद्धतीने ७० वयोवृद्ध नागरिकांचे ज्यांचे वय ८० च्या वरचे आहेत त्यांचे लसीकरण करून घेतले असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आज सत्तरीच्या वरच्या नागरिकांना लसीकरणासाठी बोलावण्यात आले होते; परंतु  त्या नागरिकांना परत जावे लागले. इतकेच नाही तर अनेक नागरिकांना नोंदणी करताना अडचणी येत आहेत, असं सामंत यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button