१ मेपासून प्राथमिक स्तरावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता; राजेश टोपेंचे सूतोवाच

rajesh tope - Vaccination - Maharashtra Today

मुंबई :- लसींचे डोस अपुरे आहेत आणि नव्या डोसचा पुरवठादेखील पुरेसा नाही. यामुळे १ मेपासून राज्यात १८ ते ४४ वयोगटामध्ये लसीकरण सुरू होणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले. मात्र, आज राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी १ मेपासून राज्यात प्राथमिक स्तरावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातले सूतोवाच केले आहे.

“१ मे रोजी महाराष्ट्रदिनाच्या पूर्वसंध्येला १८ ते ४४ वयोगटातील काही नागरिकांना निवडक लसीकरण केंद्रांवर लस दिली जाऊ शकते. पण नोंदणी करून ज्यांना लसीकरणासाठी अपॉइंटमेंट मिळेल, त्यांनीच संबंधित केंद्रावर जायचे. सुरुवातीला जिल्ह्यात एखादे केंद्र असू शकेल. ज्यांची नोंदणी होईल, त्यांनीच केंद्रावर जावे. लस अतिशय नाममात्र स्वरूपात आहे.” असे राजेश टोपेंनी सांगितले आहे. “मे महिन्यात १३ ते १४ लाख लसीचे डोस देऊ.”

असे सीरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट केले आहे. ”भारत बायोटेक कोवॅक्सिनचे ४ ते ४.५ लाख डोस देऊ शकेल. या दृष्टीने १८ ते ४४ वयोगटासाठी कमी केंद्रांवर लसीकरण सुरू करणार. पण एक नक्की आहे की, केंद्र खूप कमी ठेवले तर जास्त कालावधीसाठी लसीकरण सुरू राहील.” असे राजेश टोपे म्हणाले.

ही बातमी पण वाचा :  १ मे नंतर लस नसल्यास केंद्रीय आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?; पी. चिदंबरम यांचा सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button