विद्यार्थ्यांचे आधी लसीकरण करा, मग परीक्षा घ्या; मनीष सिसोदियांची केंद्राकडे मागणी

Manish Sisodia

नवी दिल्ली :- सध्या देशात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचे संकट कायम आहे. या साथीचा शिक्षण क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. बऱ्याच महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा लांबणीवर आहेत. तर काही राज्यांत परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पास केले आहे. अशातच शिक्षणमंत्री आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी झालेल्या बैठकीत बारावीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस देण्याची मागणी केली आहे.

यावेळी ते म्हणाले की, “देशात कोरोना विषाणूची तिसरी लाट आली तर विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. यामुळे दिल्ली सरकार कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेण्याच्या बाजूने नाही. बारावीच्या विद्यार्थ्यांचे आधी लसीकरण करा, नंतरच परीक्षा घेणे सुरक्षित होईल.”

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे आयोजन करणे अत्यंत घातक ठरू शकते. केंद्र सरकारने प्राधान्याने विद्यार्थ्यांचे लसीकरण (Vaccination) करावे. तसेच शिक्षकांचेही लसीकरण करावे, यासाठी लस उत्पादक कंपनी फायझरशी बोलायला हवे. केंद्राने जर लस उपलब्ध करून दिली तर राज्य सरकार एका आठवड्यात बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना लस देऊ शकतील. बारावीत शिकणारे सुमारे ९५ टक्के  विद्यार्थी १७.५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. १८ वर्षांपुढील नागरिकांना दिली जाणारी लस या विद्यार्थ्यांनाही दिली जाऊ शकते, असे सिसोदिया यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button