उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांचा राजीनामा

Trivendra Singh Rawat Resing

दिल्ली : उत्तराखंड विधनासभा निवडणुकीआधी राज्यात भाजपामध्ये (BJP) मोठी उलाथापालथ सुरू आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्याविरुद्ध पक्षाच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांच्यासोबत झालेल्या दोन बैठकांनंतर आज (मंगळवारी) मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. उत्तराखंडचे राज्यपाल बेबी राणी मौर्य (Governor Baby Rani Maurya) यांना राजीनामा सादर केला.

रावत यांनी सोमवारी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या आधी त्यांनी राज्यसभा सदस्य अनिल बलूनी यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर नड्डांसोबत त्यांची जवळपास ४० मिनिटे बैठक झाली. या चर्चेनंतर माध्यमांच्या प्रश्नाचे रावत यांनी उत्तर दिले नाही व ते दिल्लीकडे रवाना झाले होते.

मुख्यमंत्री रावत आणि भाजपा अध्यक्ष नड्डा यांच्यातील बैठक ही दोन दिवसांपासून उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या नाट्यमय घडमोडींच्या पार्श्वभूमीवर पार पडली. भाजपाचे उपाध्यक्ष रमन सिंह आणि सरचिटणीस व राज्याचे प्रभारी दुष्यंत गौतम कोणताही नियोजित कार्यक्रम नसताना देहरादूनला पोहचले आणि राज्याच्या कोर कमिटीतील नेत्यांसोबत बैठक केली होती. यानंतर या दोघांनी त्यांचा अहवाल भाजपा अध्यक्ष नड्डा यांच्याकडे सोपवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER