उत्तरप्रदेश पोलीस हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला अटक

Vikas Dubey Arrested

कानपूर :- उत्तरप्रदेशात गुंडाराज चालवणारा, पोलिसांची हत्या करून फरार झालेला आरोपी विकास दुबे आज अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. त्याला शोधणा-याला पाच लाखांचे  बक्षीसदेखील ठेवण्यात आले होते.

मध्यप्रदेशातील उज्जैन येथून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. २ जुलै रोजी कानपूर येथे अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर कुख्यात गुंड विकास दुबे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून विकास दुबे फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी त्याच्यावर पाच लाखांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.

उज्जैनचे जिल्हाधिकारी आशिष सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास दुबे महाकाल मंदिराच्या भागात सापडला व त्याला लगेच बेड्या ठोकण्यात आल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER