उत्तरप्रदेश प्रकरण : डॉ. नीलम गोऱ्हे यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र

Neelam Gorhe & Amit Shah

पुणे : उत्तरप्रदेश हाथरस येथील बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या पीडित कुटुंबाला उत्तरप्रदेश पोलिसांनी पहिल्यांदा बंदी करून ठेवले. कोणाला भेटण्याची परवानगी दिली नाही. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी काल  हाथरस येथे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेल्या होत्या. या दरम्यान उत्तरप्रदेश पोलीस प्रशासनाने त्यांना थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यातील एक पुरुष पोलीस कर्मचाऱ्याने गांधी यांचा  कुर्ता पकडून ओढले. याबाबत महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती यांनी खेद व्यक्त केला.

याबाबत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना  पत्र लिहून संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे. बंदोबस्तादरम्यान महिला पोलीस या ठिकाणी असणे आवश्यक होते; परंतु असे झाले नाही, असा प्रश्नदेखील यावेळी डॉ. गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी सदरील पत्रात  उपस्थित केला आहे. तसेच या कुटुंबाला उत्तरप्रदेश पोलिसांचे सहकार्य लाभत नाही; परिणामी हे सर्व प्रकरण पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करणारे असल्याने या कुटुंबाला केंद्रीय पोलिसांचे संरक्षण देण्यासाठीदेखील विचार व्हावा, असेदेखील या पत्रात म्हटले आहे.

या घटनेत ज्या ज्या अधिकाऱ्यांकडून दिरंगाई झाली किंवा ज्यांनी संवेदनहीनतेने काम केलं त्यांच्यावरती कारवाई तर व्हावीच. त्याचबरोबर एक महिन्याच्या आत या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचे सक्षम सरकारी वकील मिळाले पाहिजेत, अशी अपेक्षा  डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर उत्तरप्रदेश येथील लोकप्रतिनिधी सुरेंद्र सिंह आणि रणजित श्रीवास्तव यांनी या घटनेवरून महिलांच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करून महिलांनाच बदनाम केले असल्याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी खेद व्यक्त करून या नेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री शहा यांच्याकडे केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER