उत्तरप्रदेश : पंचायत निवडणुकीत भाजपाला जोरदार धक्का

BJP - ELection - Maharashtra Today

नवी दिल्ली :- उत्तरप्रदेशात गेल्या महिन्यात चार टप्प्यांत पंचायत निवडणुका झाल्या. या निवडणुकीच्या निकालात भाजपाचे (BJP) गड मानले जात असलेल्या भागांमध्ये पक्षाचा जबर पराभव झाला.

अयोध्येत सपा

अयोध्येत जिल्हा पंचायतीच्या ४० जागा आहेत. समाजवादी पक्षाने २४ जिंकल्या. भाजपाला फक्त सहा जागा मिळाल्या आहेत. इथे १२ अपक्ष उमेदवार जिंकले. इथे भाजपात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. त्याचाही झटका भाजपाला बसला. पक्षाने तिकीट नाकारलेल्या १३ जागांवर बंडखोर मैदानात उतरले होते.

काशीमध्ये सपा

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये जिल्हा पंचायतच्या ४० जागा आहेत. इथे सपाचे १४, भाजपाचे आठ, अपना दल (एस)  तीन, आम आदमी पार्टी आणि उत्तरप्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. तीन जागांवर अपक्ष जिंकलेत. २०१५ मध्ये काशीमध्ये भाजपचा पराभव झाला होता; परंतु योगी सरकार सत्तेत आल्यानंतर जिल्हा पंचायत भाजपाने सपाकडून जिंकून घेतली होती.

मथुरेत बसपा

मथुरेत बसपाने १२ जागा जिंकल्यात. आरएलडी नऊ  आणि भाजपाला आठ  मिळाल्यात. सपाने एक, अपक्षांनी तीन जागा जिंकल्या. या निवडणुकीत काँग्रेसही उतरली होती; पण बहुसंख्य ठिकाणी पक्षाची कामगिरी निराशाजनक आहे. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, काशी, अयोध्या आणि मथुरा हे भाजपा सरकारचे गड आहेत. भाजपाने या शहरांसाठी अनेक योजना घोषित केल्या आहेत. या शहरांना धार्मिक कारणांमुळेदेखील महत्त्व आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button