जगातील सर्वोत्तम पोलिसांचा वापर बॉम्बची गाडी ठेवण्यासाठी ! हे भयंकरच – राज ठाकरे

Raj Thackeray - Maharashtra Today

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराजवळ जिलेटीनच्या कांड्या असलेली कार ठेवण्यात वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) याचा संबंध असल्याच्या मिळत असलेल्या संकेतानंतर मनसेचे नेते राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला – जगातील सर्वोत्तम पोलिसांचा वापर बॉम्बची गाडी ठेवण्यासाठी ! हे भयंकरच.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून – अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिन वाझे याला दरमहिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक आरोप केला. यानंतर राजकारणात मोठे वादळ आले आहे. राज ठाकरे यांनी पत्रपरिषद घेऊन आज याबाबत मत व्यक्त केले. मुंबई पोलिसांच्या जागतिक प्रतिष्ठेचा विशेष उल्लेख करून, या सरकारने मुंबई पोलिसांची (Mumbai Police) प्रतिष्ठा धुळीत मिळवली आहे, असे सांगितले.

राज ठाकरे म्हणाले की, माझी माध्यमांना विनंती आहे की, हा विषय गंभीर आहे ह्याची जाणीव ठेवून तो विषय भरकटू देऊ नका. हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून केला ह्याचा शोध घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER