मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर; नारायण राणेंविरोधात तक्रार दाखल

Naryane Rane & Uddhav Thackeray

सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना ‘गांडूळ, पुळचट’ यासारखे आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी बार्शी पोलिसात नारायण (Naryane Rane) राणेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. राणे यांच्याविरुद्ध कलम ५०४, ५०६ अंतर्गत अदखलपात्र एनसी दाखल करण्यात आली आहे. राणेंनी भाषणातून मुख्यमंत्र्यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरोधात सोलापुरात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना ‘गांडूळ, पुळचट’ यासारखे शब्द वापरल्याने बार्शी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.  शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणाच्या अनुषंगाने भाजपा खासदार नारायण राणे यांनी टीका केली. चॅनेल, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवरून राणेंनी उद्धव ठाकरे यांना तुमची मुख्यमंत्री होण्याची लायकी नाही, पुळचट आणि बुद्धू मुख्यमंत्री, गांडूळ, याची लायकी नाही, मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी शिवीगाळ आणि दमदाटीची भाषा वापरून सर्वसामान्य आणि शिवसैनिकांचा अपमान केला, अशी तक्रार दाखल केली व कारवाई न केल्यास सोमवारी त्यांच्या पुतळ्याचे दहन करू, असा इशारा दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यात नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना नाव न घेता बेडूक आणि बेडकाची पिल्ले म्हटले होते. या टीकेला नारायण राणे यांनी सोमवारी मुंबईतील भाजपा मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा चांगला पाणउतारा केला. नारायण राणे म्हणाले – दसरा मेळावा म्हणजे ४७ शिवसैनिकांमध्ये झालेली भव्य सभा होती.

आजवर महाराष्ट्रात जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या कार्याने आणि भाषणशैलीने देशात राज्याची प्रतिष्ठा वाढवली. याला सध्याचे मुख्यमंत्री अपवाद आहेत. तेच उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर टीका करतात. मोदींच्या धोरणावर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. त्यांनी महाराष्ट्राचा कारभार सांभाळावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER