RT-PCR रॅपिड टेस्टसाठी मधमाश्यांचा उपयोग; त्वरित निदान!

RTPCR - Maharashtra Today

नवी दिल्ली : कोरोना टेस्टसाठी RT-PCR हाच एक योग्य पर्याय मानला गेला आहे. आता कोरोना टेस्टसाठी वैज्ञानिकांनी मधमाश्यांचा उपयोग केला आहे; या चाचणीत त्वरित निदान होते! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात दररोज चार लाखांवर रुग्ण आढळत आहेत. आरटीपीसीआर टेस्ट (Corona RT-PCR Test) करणाऱ्या लॅबवर दबाव वाढला आहे. रिपोर्ट मिळण्यासाठी रुग्णांना पाच-सात दिवस लागतात, हे उल्लेखनीय.

अशी होते टेस्ट
वॉशिंग्टन पोस्टने माहिती दिली आहे की, कोरोनाचा विषाणू मधमाशा वासावरून ओळखू शकतात हे लक्षात आल्यानंतर वैज्ञानिकांनी मधमाश्यांना प्रशिक्षित केले. कोरोनाचा रुग्ण समोर येताच या मधमाशा जीभ बाहेर काढतात!

असे दिले प्रशिक्षण
या प्रयोगात १५० मधमाश्यांना ‘पॉवलोवियन कंडिशनिंग’ पद्धतीने प्रशिक्षित केले. कोरोनाचे विषाणू त्यांच्यासमोर आल्यानंतर त्यांना साखरेचे पाणी देत होते. यामुळे, या मधमाश्यांना कोरोनाच्या विषाणूंचा वास आला की त्या साखरेचे पाणी मिळेल म्हणून जीभ बाहेर काढतात. चाचणीत रुग्णांना या मधमाश्यांजवळ आणल्यानंतर, रुग्णाला कोरोना असेल तर मधमाशा कोरोनाच्या विषाणूच्या वासाने जीभ बाहेर काढतात. चाचणीचा निकाल लगेच कळतो!

गरीब देशांसाठी फायदेशीर
वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, ज्या देशांकडे ‘पॉलिमरायझेशन चेन टेस्ट’साठी आवश्यक साहित्य आणि तंत्रज्ञान नाही त्यांच्यासाठी ही टेस्ट फायद्याची ठरेल. वॅगनिनजेन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि या संशोधनाचे नेतृत्व करणारे विम वॅनडर पोयल म्हणतात की, जगातल्या काही गरीब देशांकडे, मुख्यत्वे कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये पॉलिमरायझेशन टेस्टचे साहित्य उपलब्ध नाही. मधमाशा सगळीकडेच असतात; त्यांना फक्त प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button