महाराष्ट्रात लसीकरणासाठी ‘केरळ पॅटर्न’ वापरा; शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांना विनंती

CM Uddhav Thackeray - Coronavirus Vaccine - Deepak Sawant

मुंबई : एकीकडे कोरोनाच्या (Corona) लसीचा तुटवडा, वाया जाणारे लसींचे डोस आणि हवालदिल झालेले जेष्ठ नागरिक… असे चित्र सर्वत्र पहायला मिळत असताना आपल्याच देशातील केरळ राज्याने मात्र, कोरोना लसीकरणाचा (Coronavirus Vaccination) प्रत्येक थेंबनथेंब वापरून एक आदर्श घालून दिला आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी केरळ पॅटर्नचा अवलंब करा, अशी मागणी माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक सावंत (Deepak Sawant) यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) पत्रही लिहिले आहे.

केंद्र सरकारकडून केरळला 73लाख 26 हजार 806 लस प्राप्त झाल्या. मात्र, त्यामधून 74 लाख 26 हजार 164 लोकांना लस देण्यात आली. त्यामुळे 88 हजार जास्त लोकांना लस देण्यात केरळ सरकारला यश मिळाले आहे. लसीची थोडी मात्रा फुकट जाऊ न दिल्यामुळे केरळला ही गोष्ट साध्य झाल्याचे दीपक सावंत यांनी पत्रात म्हटले आहे.

त्यासाठी लसीकरण केंद्रांवर योग्य नियोजन करण्यात आले. लसीच्या एका कुपीतून 10 लोकांना लस देता येते. त्यामुळे तेवढे लोक असल्याशिवाय संबंधित केंद्रावर लसीकरणाला सुरुवात केली जात नसे. 0.5 ml त्याप्रमाणात डोस कमी न करता ही लस दिली. त्यासाठी Auto disposable syringe वापरण्यात आल्याचे दीपक सावंत यांनी पत्रात म्हटले आहे.

असाच प्रोटोकॉल महाराष्ट्र सरकारने आपल्याकडे तयार करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात लसीकरण पुरवठयावरना होणाऱ्या वादावर तोडगा निघू शकतो असा विश्वास माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button