स्वस्तात घेतलेले तेल वापरा”, सौदीने भारताला सुचवला उपाय

OPEC

दिल्ली : भारतात पेट्रोलच्या रोज वाढणाऱ्या दरांमुळे लोकांचे आर्थिक गणित विस्कळीत होते आहे. तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकच्या(OPEC) धोरणानुसार, तेल उत्पादक देशांनी तेलाचे उत्पादन कमी केल्याने तेलाचे दर वाढत आहेत. भारताने ओपेकला तेलाचे उत्पादन वाढवण्याची सूचना केली त्यावेळी ओपेकचा प्रमुख घटक सौदी अरेबियाने भारताला सुचवले – गेल्या वर्षी स्वस्तात खरेदी केलेले साठवणीतले तेल वापरा.

या संदर्भात बोलताना सौदी अरेबियाचे ऊर्जामंत्री प्रिन्स अब्दुलअजीझ बिन सलमान (Prince Abdulaziz bin Salman) पत्रकार परिषदेत म्हणालेत की, भारताने त्यांच्या साठ्यांमधून गेल्या वर्षी अत्यंत स्वस्त दरात ( cheap oil) खरेदी केलेले तेल वापरावे.

गेल्या वर्षी एप्रिल-मे महिन्यामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १९ डॉलर प्रतिबॅरलच्या आसपास होत्या. तेव्हा भारताने सुमारे १ कोटी ६७ लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी करून विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) आणि मँगलोर, पदुर (कर्नाटक) इथल्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हमध्ये ठेवले आहे.

गेल्या वर्षी कोविडच्या साथीमुळे पेट्रोलची मागणी प्रचंड कमी झाली होती. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर रहाव्यात यासाठी तेलाचे उत्पादन करण्याच्या ओपेक देशांच्या निर्णयाला भारतानं समर्थन दिले होते. जानेवारी २०२१मध्ये पुन्हा उत्पादन पूर्ववत करण्यात येईल, असे आश्वासन त्यावेळी ओपेक देशांनी दिले होते. पण आता ओपेकने तेलाचे उत्पादन वाढवायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. ओपेकची पुढची बैठक १ एप्रिल रोजी आहे, तेव्हा यासंदर्भात काय निर्णय होईल याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER