नेपाळने जिंकला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात झटपट सामना

USA-Nepal create record for playing shortest completed ODI
  • ६०० चेंडूचा सामना आटोपला फक्त १०४ चेंडूतच
  • अमेरिकन संघ फक्त ३५ धावात गारद
  • नेपाळने ३२ चेंडूतच जिंकला सामना

सामना होता ६०० चेंडूचा पण आटोपला फक्त १०४ चेंडूतच. अर्थातच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा सर्वात कमी अवधीत पूर्ण झालेला सामना ठरला आणि त्यात नेपाळच्या संघाने अमेरिकन संघाला ८ गडी आणि तब्बु २६८ चेंडू शिल्लक राखून मात दिली. काठमांडूनजिकच्या कीर्तीपूर येथील विद्यापीठ मैदानावर हा सामना खेळला गेला. यासह अमेरिकेची जगावर हुकमत असली आणि खेळांमध्येही ते सुपर पॉवर असले तरी क्रिकेटमध्ये त्यांना अजुन बराच पल्ला गाठायचा आहे हे दिसून आले.

एकदिवसीय आंतररराष्ट्रीय क्रिकेटमधील या सर्वात झटपट निकालाच्या सामन्यात अमेरिकन संघाचा डाव नेपाळी गोलंदाजांनी फक्त १२ षटकांतच अवघ्या ३५ धावांत गुंडाळला आणि नंतर फक्त ३२ चेंडूतच विजयी लक्ष गाठले मात्र त्यासाठी त्यांनी दोन गडी गमावले.

ही बातमी पण वाचा : महिला विश्वचषक क्रिकेटसाठी भारताच्या जी.एस.लक्ष्मी रेफरी

अमेरिकेच्या ३५ धावा ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांतील सर्वात कमी धावसंख्या ठरली आणि ते १२ षटकात बाद होणे हा एखादा संघ सर्वात कमी षटकात बाद होण्याचा नवा विक्रम आहे.

नेपाळच्या संदीप लामीछेनच्या गुगलीवर अमेरिकन फलंदाजांची चांगलीच तारांबळ उडाली. त्याने ६ षटकात फक्त १६ धावात सहा गडी बाद केले तर सुशण ऐरी या डावखुºया फिरकी गोलंदाजाने पाच धावांत चार गडी बाद केले. अमेरिकन सलामीवीर झेवियर मार्शल (१६) वगळता त्यांचे सर्व फलंदाज एकेरी धावात बाद झाले. नेपाळसाठी पारस खडकाने नाबाद २० व दिपेंद्र सिंगने नाबाद १५ धावा केल्या.

सर्वात कमी धावसंख्या
अमेरिका -३५ वि. नेपाळ -२०२०
झिम्बाब्वे- ३५ वि. श्रीलंका- २००४
कॅनडा- ३६ वि. श्रीलंका- २००३

सर्वात कमी षटकांत संघ गारद
अमेरिका- १२ षटकं वि. नेपाळ -२०२०
झिम्बाब्वे – १३.५ षटकं वि. अफगणिस्तान -२०१७
नामिबिया- १४ षटकं वि. आॅस्ट्रेलिया- २००३