दोन मसाज पार्लरमध्ये गोळीबार; आठ ठार

Maharashtra Today

अ‍ॅटलांटा : अमेरिकेतील अ‍ॅटलांटा शहर आणि उपनगरातील दोन मसाज पार्लरमध्ये अंदाधूंद गोळीबार (us-violence-8-killed-in-fatal-shootings) करण्यात आला. यात ८ जणांचा जीव (8 kill)गेला. प्राथमिक माहितीनुसार ठार झालेल्यात

आशियाई महिलांचा समावेश आहे. या संदर्भात पोलिसांनी दक्षिण पश्चिम जॉर्जियातून एका २१ वर्षांच्या युवकाला अटक केली आहे.

अ‍ॅटलांटा शहराचे मुख्य पोलीस अधिकारी रॉडनी ब्रायंट यांनी सांगितले की, पहिली घटना अ‍ॅटलांटातील ईशान्येकडच्या भागामध्ये असलेल्या एका मसाज पार्लरमध्ये घडली. इथे गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका पार्लरमध्ये झालेल्या गोळीबारात चार जण मरण ठार झालेत. या चारही महिला असून, त्या आशियाई वंशाच्या आहेत.

सायंकाळी ५.५० वाजता मसाज पार्लरमध्ये चोरी झाली. यावेळी झालेल्या गोळीबारात तीन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती अ‍ॅटलांटा पोलिसांनी दिली. घटनास्थळी पोलीस पाहणी करत असतानाच आणखी एका पार्लरमध्ये गोळीबार झाल्याची माहिती फोनवरून कळाली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या मसाज पार्लरमध्ये झालेल्या या गोळीबारात चार महिला ठार झाल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER