सीरियातून माघार; ट्रम्प यांच्या निर्णयाबाबत अमेरिकेच्या लष्कराची नाराजी

- हा तर कुर्दांचा विश्वासघात

us-troops-express-anger-at-trump-s-syria-policy

वॉशिंग्टन :- अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियातून सैन्य परत बोलावण्याचा निर्णयावर लष्कराने नाराजी व्यक्त केली आहे. सीएनएन वृत्तवाहिनीने याबाबत दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की अमेरिकेच्या लष्कराने आणि सुरक्षा विभागाने – हा कुर्दांचा विश्वासघात आहे, असे म्हटले आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, दहशतवादाविरुद्धच्या युद्धात कुर्द योद्धयांनी केलेल्या कारवाईची गेल्यावर्षी ट्रम्प यांनी प्रशंसा केली होती. दहशतवादाविरुद्धच्या युद्धात कुर्दांनी अमेरिकेच्या लष्कराची मदत केली, अशी त्यांची पाठ थोपटली होती. आणि आता आरोप केला की दहशतवादाविरुद्धच्या युद्धात कुर्दांनी अमेरिकेची मदत केली नाही!

अमेरिकेने सीरियातून लष्कर मागे घेतल्यानंतर तुर्कीने सिरीयात, कुर्दांवर हवाईहल्ले करून हजारो कुर्दांना ठार केले.

यावर अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आयएसआयएसआयविरुद्धच्या युद्धात कुर्दांनी आम्हाला कशी मदत केली हे सगळ्या जगाला माहीत आहे. अमेरिकेने सीरियातून लष्कर परत बोलावणे आणि त्यानंतर तुर्कीने कुर्दांवरचे हल्ले थांबवावे यासाठी काहीही न करणे हा कुर्दांचा विश्वासघात आहे.

ही बातमी पण वाचा : मोदीच काय डोनाल्ड ट्रम्प जरी आले तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही : धनंजय मुंडे