अमेरिकेचा विक्रम : ड्रोणमधून हवेत लढाऊ विमानात भरले इंधन, जग स्तंभित

Fighter Plane - Maharashtra Today

अनेक देशांना अजून टँकर विमानातून लढाऊ विमानांमध्ये हवेतल्या हवेत इंधन भरणे शक्य झाले नसताना अमेरिकेने ड्रोणने हवेत लढाऊ विमानात इंधन भरण्याचा विक्रम केला. अमेरिकी नौदलाच्या मानवरहित टँकर ड्रोणने हवेतच F/A-18 सुपर हॉर्नेट लढाऊ विमानात इंधन भरून इतिहास रचला. अमेरिकेच्या या कारनाम्यामुळे सारी दुनिया हैराण आहे.

ड्रोणमधून लढाऊ विमानात इंधन भरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झाला आहे. हा प्रयोग इलिनोइसच्या मस्कौटामध्ये मिडअमेरिका विमानतळाच्या परिसरात करण्यात आला. हे ड्रोण अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकांद्वारे ऑपरेट केले जाण्याची योजना आहे. यामुळे लढाऊ विमानांना वारंवार इंधन भरण्यासाठी खाली उतरावे लागणार नाही. असे झाल्यास भरसमुद्रात युद्धाच्या वेळी हवेतल्या हवेत आरामात इंधन भरता येणार आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, युद्धनौकांवरून उड्डाण करणे आणि उतरणे हे खूप कौशल्याचे आहे. कमी लांबीची धावपट्टी असल्याने मोजक्याच अंतरावरून हेलकावे घेत हवेत झेपावणे आणि पुन्हा कमी अंतरावर विमान थांबवणे कठीण असते. यामुळे समुद्रावर हवेतल्या हवेत विमानात इंधन भरता येणे आता सोपे होणार आहे. यामुळे विमानांचे अपघात होण्याचा धोका कमी होणार आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button