अमेरिकन जनता महात्मा गांधींच्या विचारांसोबत : डोनाल्ड ट्रम्प

US Prez Donand Trump pays tribute to Mahatma Gandhi

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍याचा आजचा दुसरा दिवस असून, आज ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी राजघाट येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना सकाळी ११च्या सुमारास श्रद्धांजली अर्पण केली.

तेथील अतिथी-नोंदवहीमध्ये त्यांनी संदेशही लिहिला. अमेरिकन जनता महात्मा गांधींच्या विचारांसोबत आहे, असे त्यांनी या संदेशात नमूद केले.

राजघाटावर रवाना होण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी राष्ट्रपती भवनास भेट दिली. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी ट्रम्प यांना भारतीय लष्कराच्या तिन्ही सैन्य दलांतर्फे ‘गार्ड ऑफ ऑनर’ म्हणून २१ तोफांची सलामी देण्यात आली.

प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहलला ट्रम्प यांची सपत्नीक भेट