‘एअरफोर्स वन’ची शिडी चढताना तीनदा तोल गेला बायडेनचा; व्हीडीओ व्हायरल

Maharashtra Today

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) राष्ट्राध्यक्षांसाठीच्या ‘एअरफोर्स वन’ (Air Force One)विमानाची शिडी चढत असताना त्यांचा तीन वेळा तोल गेला. त्यांनी स्वतःला सावरले त्यामुळे त्यांना इजा झाली नाही (joe-biden-stumbles-thrice-trying-to-board-air-force-one). या घटनेचा व्हीडीओ व्हायरल (Video viral) झाला आहे.

बायडेन विमानाची शिडी चढत असताना सहा-सात पायऱ्या चढल्यावर त्यांचा तीन वेळा तोल गेला. एकदा तर ते चांगलेच घसरलेत. त्यांनी शिडीचा दांडा धरून स्वतःला सावरले.

जो बायडेन शुक्रवारी आशियाई-अमेरिकी समुदायाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी अटलांटाच्या दौऱ्यावर निघाले होते. अटलांटा जाण्यासाठी ते एअरफोर्स वन या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसाठी असलेल्या विशेष विमानाची शिडी चढत होते.

शिडी पूर्ण चढल्यानंतर विमानाच्या प्रवेशद्वाराजवळ सॅल्यूट ठोकून ते विमानात बसण्यासाठी निघून गेले. या घटनेनंतर जो बायडेन यांची प्रकृती १०० टक्के ठणठणीत आहे अशी माहिती व्हाइट हाउसकडून माध्यमांना देण्यात आली आहे. ‘बायडेन शिडी चढत होते त्यावेळी जोरात वारा वाहत होता, त्यामुळे त्यांचा तोल गेला असावा, असे व्हाइट हाउसने म्हटले आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बायडेन यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती, त्यामुले व्हाइट हाउसने बायडेन स्वस्थ असल्याचे सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER