साबरमती आश्रमात ट्रम्प दांपत्याने केली सूतकताई

Donald Trump - Sabarmati Ashram

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात दाखल झाले असून त्यांचा नियोजित दौरा सुरू झाला आहे. रोड शो केल्यानंतर त्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी ट्रम्प दांपत्याने चरख्यावर सूतकताई केली. यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील होते.

ट्रम्प दांपत्याचे साबरमती आश्रमात आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांना खादीची शाल भेट देण्यात आली. दरम्यान, मोदींनी त्यांना या आश्रमाची माहिती दिली. यावेळी ट्रम्प दांपत्याने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर या आश्रमाचे महत्त्व मोदींनी त्यांना समजावून सांगितले.

Donald Trump

साबरमती आश्रमाच्या भेटीनंतर ट्रम्प यांनी आश्रमातील व्हिजिटर्स बूकमध्ये संदेश लिहिला. ‘To My Great Friend Prime Minister Narendra Modi Thank You For This Wonderful Visit.’ म्हणजेच या सुंदर भेटीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींचे आभार मानले.

दरम्यान, सुरुवातीला मोदींनी डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांना चरख्यावर सूतकताई कशी करायची याची माहिती दिली.