यंदाच्या यूएस ओपन विजेत्याला मिळणार ३० लाख डॉलर

Sports

३१ ऑगस्टपासून होणाऱ्या यंदाच्या यूएस ओपन टेनिस स्पर्धेत आघाडीचे खेळाडू कोरोनाच्या भीतीपायी माघार घेत आहेत; मात्र आयोजकांनी बक्षीस रक्कम जवळपास गेल्या वर्षीच्या बक्षीस रकमेएवढीच ठेवली आहे. आयोजकांनी जाहीर केलेल्या बक्षीस रकमेच्या विवरणानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम ९५ टक्के आहे. त्यानुसार यंदाच्या एकेरी विजेत्याला ३० लाख डॉलर मिळणार आहेत. यंदाची एकूण बक्षीस रक्कम ५ कोटी ३४ लाख डॉलर आहे.

महिला एकेरीत पहिल्या फेरीची बक्षीस रक्कम ५ टक्क्यांनी वाढली आहे. यंदा ही रक्कम ५८ हजार डॉलरवरून ६१ हजार डॉलर आहे. दुसऱ्या व तिसऱ्या फेरीची रक्कम मागच्या वर्षीएवढीच आहे.

याशिवाय अमेरिकन टेनिस असोसिएशनने (USTA) ७६ लाख डॉलरची रक्कम खेळाडूंना अर्थसाहाय्यासाठी ठेवली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय टेनिस बंद असल्याने व्यावसायिक टेनिसपटूंचे उत्पन्न ठप्प आहे. याआधीसुद्धा खेळाडूंच्या मदतनिधीसाठी त्यांनी १० लाख डॉलरचे योगदान दिले आहे. त्यानंतर आता पात्रता स्पर्धा घेणार नसल्याने आणि दुहेरीचा ड्रॉ कमी जोड्यांचा असल्याने यूएसटीएने ६६ लाख डॉलरचे अनुदान दिले आहे. ही रक्कम पुरुष व महिला खेळाडूंमध्ये विभागून देण्यात येणार आहे.

यंदाची बक्षीस रकमेची विभागणी :

पुरुष व महिला एकेरी
विजेता- ३० लाख डॉलर
उपविजेता- १५ लाख डॉलर
उपांत्य फेरी- ८ लाख डॉलर
उपांत्यपूर्व फेरी- ४ लाख २५ हजार डॉलर
चौथी फेरी- २ लाख ५० हजार डॉलर
तिसरी फेरी- १ लाख ६३ हजार डॉलर
दुसरी फेरी- १ लाख डॉलर
पहिली फेरी- ६१ हजार डॉलर

दुहेरी (सांघिक रक्कम)

विजेते- ४ लाख डॉलर
उपविजेते- २ लाख ४० हजार डॉलर
उपांत्य फेरी- १ लाख ३० हजार डॉलर
उपांत्यपूर्व फेरी- ९१ हजार डॉलर
दुसरी फेरी- ५० हजार डॉलर
पहिली फेरी- ३० हजार डॉलर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER