अमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत !

Swastik

न्यूयॉर्क : न्यूयॉर्क परिसरात एका शहराचे नाव आहे स्वस्तिक. शहरातील नागिरकांना यात काही आक्षेपार्ह वाटत नाही. मात्र, बाहेरचे लोक याचा संबंध हिटलरच्या नाझीशी जोडून हे नाव बदलण्याची मागणी करत होते. याबाबत शहराचे मत जाणून घेण्यासाठी जनमत चाचणी घेण्यात आली. स्वस्तिक या नावाच्या विरोधात एकही मत पडले नाही ! शहराचे संचालन करणाऱ्या ब्लैक ब्रुक टाउ बोर्डचे पर्यवेक्षक जॉन डगलस यांनी शहराचे ‘स्वस्तिक’ नाव कायम ठेवण्याचा निर्णय घोषित केला.

जॉन डगलस यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की – या शहराच्या मूळनिवासींनी सन् १८०० मध्ये या शहराचे नाव संस्कृतच्या ‘स्वस्तिक’ शब्दावरून ठेवले. स्वस्तिकचा अर्थ आहे कल्याण! ज्या लोकांना आमच्या संस्कृतीची माहिती नाही ते स्वस्तिक शब्दाला भितात, याला विरोध करतात. त्यांना आमचा इतिहास माहित नाही. आम्हाला त्यांच्या बुद्धीची कीव येते.

स्वस्तिक या शब्दाबद्दल ‘संयुक्त राज्य स्मारक मेमोकॉस्ट संग्रहालया’त उपलब्ध असलेल्या माहितीत म्हटले आहे की, या संस्कृत शब्दाचा उपयोग ‘सौभाग्य’ किवा ‘मंगल प्रतीक’ या अर्थाने होतो. हे प्रतीक ७ हजार वर्षांपासून आढळते. स्वस्तिकला शुभ चिन्ह मानतात. घरात-मंदिरांमध्येही लावतात.

१९ व्या शतकाच्या अखेरीस स्वस्तिक युरोपमध्ये लोकप्रिय झाले. १९२० ला जर्मनीच्या नाझी पक्षाने त्यात थोडा बदल करून पक्षासाठी निवडले. त्यामुळे मूळ स्वस्तिक आणि नाझिंचे स्वस्तिक यात अंतर आहे. स्वस्तिकमधील नागरिक म्हणतात आमचा नाझीच्या स्वस्तिकांशी काहीही संबंध नाही. नाझिंनी स्वस्तिकसारखे चिन्ह निवडण्याच्या कितीतरी आधी आम्ही आमच्या शहराचे नाव स्वस्तिक ठेवले आहे !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER