अमेरिकेच्या नौदलाची लेझर शस्त्राची चाचणी; उडते विमान नष्ट करते !

अमेरिका : अमेरिकेच्या नौदलाने ‘हाय-एनर्जी लेझर शस्त्रा’ची यशस्वी चाचणी केली. पॅसिफिक महासागरातील युद्धनौकेवरून ही चाचणी करण्यात आली. हे शस्त्र हवेत उड्डाण करणारे विमान नष्ट करू शकते, असे नौदलाच्या पॅसिफिक फ्लीटने सांगितले.

या चाचणीचे फोटो आणि व्हिडिओ नौदलाने शेअर केले आहेत. यात वॉरशिपच्या डेकमधून एक धारदार लेझर किरण बाहेर पडताना दिसते. व्हिडिओनुसार या लेझर किरणाच्या माऱ्यात येणारा ड्रोण पेटतो. नौदलाने म्हटले आहे की लेझर शस्त्रे ड्रोण किंवा शस्त्रासह लहान नौकावरही डागले जाऊ शकतात.

पॅसिफिक महासागरात चाचणी

ही चाचणी नेमकी केव्हा आणि कुठे घेण्यात आली, याची माहिती नौदलाने दिली नाही. मिळालेल्या मोघम माहितीनुसार ही चाचणी पॅसिफिक महासागरात १६ मे रोजी घेण्यात आली. लेसर शस्त्राच्या मारक क्षमतेविषयी जास्त माहिती देण्यात आली नाही.

‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज’च्या २०१८ च्या अहवालात म्हटले आहे की, या शस्त्राची शक्ती १५० किलोवॅट असू शकते. पोर्टलँडचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन कॅरी सँडर्स म्हणाले की, यूएव्ही आणि छोट्या विमानांवर ही चाचणी करून आम्हाला या लेझर शस्त्राच्या सामर्थ्याविषयी बरीच माहिती मिळाली आहे. नवीन सामर्थ्याने आम्ही समुद्रावर युद्धाची नव्याने व्याख्या करत आहोत.



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER