भारत- अमेरिकेत तीन अब्ज डॉलर्सचा संरक्षणविषयक करार

trump-pm modi

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍याचा आज मंगळवारी दुसरा दिवस असून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत हैद्राबाद हाऊसमध्ये चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांनी कराराची देवाणघेवाण केली. भारत- अमेरिकेत तीन अब्ज डॉलर्सचा संरक्षणविषयक करार यावेळी करण्यात आला, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. दोन्ही नेत्यांनी प्रसिध्द केलेल्या संयुक्त पत्रकात याबाबत माहिती दिली.

अमेरिका आणि भारत संबंधांच्या प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर आमची चर्चा झाली. संरक्षण, ऊर्जा, व्यापार किंवा लोकसंबंध यावर ही चर्चा झाली. अमेरिका आणि भारतामधील संरक्षणविषयक संबंधांना मजबूत करणे, हा आमच्या द्विपक्षीय भागीदारीचा महत्त्वाचा भाग आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

भारतास भेट देणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असल्याचे यावेळी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

अमेरिकन जनता महात्मा गांधींच्या विचारांसोबत : डोनाल्ड ट्रम्प