अमेरिका : पाण्यात सापडला मानवी मेंदू खाणारा अमिबा

US- found amoeba.jpg

टेक्सास : अमेरिकेच्या (US) टेक्सास प्रांताच्या दक्षिण पूर्व भागात मेंदू कुरतडणारा जिवाणू (amoeba) सापडला आहे. हा जिवाणू पाण्यात आढळला यामुळे टेक्सासच्या प्रशासनाने आठ शहरणमधल्या नागरिकांना सुरक्षेबाबत इशारा दिला आहे.

इशाऱ्यात म्हटले आहे की – हा जीवाणू मानवी मेंदू खात असल्याचे संशोधनातून लक्षात आले आहे. खबरदारी घ्या; सांभाळून राहा अन्यथा हा जीवाणू विध्वंस घडवून आणू शकतो, असे प्रशासनाने म्हटले आहे. टेक्सास कमिशनने पर्यावरण गुणवत्तेच्या आधारावर वॉटर अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. पाणी पुरवठ्यामधून येणाऱ्या पाण्यामध्ये ‘नाइगेलेरिया फाऊलेरी’ म्हणजेच मेंदू कुडतरणारा अमिबा सापडला आहे. हे पाणी वापरू नका, अशी सूचना केली आहे.

टेक्सास कमिशन पर्यावरण गुणवत्तेचा विचार करून ब्राजोस्पोर्ट वॉटर अ‍ॅथॉरिटीसोबत मिळून लवकरात लवकर पाण्याची सध्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करते आहे. सेंटर फॉर डिजीस कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या माहितीनुसार मेंदू कुडतरणारा हा अमिबा सर्वसाधारणपणे माती, गरम पाण्याचे कुंड, नदी आणि गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये सापडतो.

अस्वच्छ स्वीमिंग पूलमध्येसुद्धा असू शकतो. औद्योगिक प्लँटमधून निघणाऱ्या गरम पाण्यामध्येसुद्धा आढळून येतो.

या पाण्याचा वापर न करण्याचा सल्ला लेक जॅक्सन, फ्रीपोर्ट, अँगलटन, ब्राजोरिया, रिचवूड, आयस्टर क्रिक, क्लूट आणि रोजनबर्ग परिसरासाठी जारी करण्यात आली आहे. टेक्सार प्रांतातील डाऊ केमिकल प्लँट आणि क्लेमेंस आणि वायने स्कॉट टेक्सास डिपार्टच्या क्रिमिनल जस्टिस येथे पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. ८ सप्टेंबरपासून पाण्यामध्ये अमिबा सापडण्याचे प्रकार सुरू झाले होते. एका सहा वर्षांच्या आजारी मुलाच्या उपचारादरम्यान हा अमिबा सापडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER