‘कोविड मुक्त भारत’साठी ५०० अब्ज डॉलर्सची दिली ऑफर; अमेरिका कंपनीचे पंतप्रधान मोदींना पत्र

PM Modi

सोमवारी एका अमेरिकन कंपनीने भारतात ५०० अब्ज डॉलर्स म्हणजेच ३६.५५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. विशेषतः या कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना वर्तमानपत्रात एक पत्र लिहिले.

अमेरिकेची कंपनी लँडॉमस रियल्टीने (American company Landomas Realty) सोमवारी एका वृत्तपत्राच्या जाहिरातीमध्ये म्हटले की, ‘ही गुंतवणूक भारताच्या पायाभूत सुविधासाठी लँडॉमस रियल्टी वेंचर्सकडून केली जाईल.’ लँडॉमस ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप कुमार सत्यप्रकाश यांनी ‘इन्व्हेस्ट इंडिया’ मोहिमेअंतर्गत २ लाख कोटी गुंतवणूकीचा पहिला टप्पा म्हणून ‘नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन’ (NIP) आणि ‘नॉन-नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन’ (Non-NIP) ही जाहिरात जाहीर केली. इंडिया इन्व्हेस्टमेंट ग्रीडअंतर्गत भारत सरकारकडून याबाबत यादी तयार केली जाईल.

या अमेरिकी फर्मकडे केवळ १९ कर्मचारी आणि एका पृष्ठाची वेबसाइट आहे. परंतु, तपासणीनंतर उघडकीस झाले की, कंपनीची वेबसाइट युनायटेड लँड बँकेने २०१५ मध्ये नोंदणी केली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी डिसेंबर २०१९ मध्ये एनआयपीची घोषणा केली होती. त्याअंतर्गत २०२०-२५ या आर्थिक वर्षात सरकारने १११ लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या गुंतवणूकीचा अंदाज लावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button