अमेरिका : महत्त्वाच्या पदांवर ८० टक्के गोरे

New York

अमेरिकेतील महत्त्वाच्या व शक्तिशाली पदांवरील ९२२ पैकी १८० लोक कृष्णवर्णीय, हिस्पॅनिक आणि आशियाई वंशाचे आहेत. हे प्रमाण टक्केवारीत ८० टक्के गोरे व केवळ २० टक्के कृष्णवर्णीय आहे, न्यूयार्क टाइम्सच्या पाहणी अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वातावरण गरम आहे. त्या संदर्भात या अहवालतून नवा वाद सुरू होऊ शकतो, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.

या महत्त्वाच्या पदात अमेरिकेत कायदा पारित करणाऱ्या लोकांचा समावेश होतो. त्यात हॉलीवूड स्टुडिआेचेही मालक,विद्यापीठांचेही नेतृत्व करतात. काही प्राे स्पाेर्ट््स संघाचे मालकही या पदांवर आहेत. काही मोठ्या कंपन्यांचे मालक आहेत. काही मूठभरांच्या हाती अर्थव्यवस्थेसंबंधी अधिकार आहेत.

सिनेट : कायदा करणारे १०० लोक , पैकी ९ आशियाई, हिस्पॅनिक

अमेरिकेत सिनेटमध्ये १०० लोक कायदानिर्मितीत आहेत.त्यातील केवळ ९ आशियाई, कृष्णवर्णीय, हिस्पॅनिक आहेत. सिनेटच्या इतिहासात फक्त २९ सिनेटर कृष्णवर्णीय झाले. या वर्गातून पहिल्यांदा टिम स्कॉट सदस्य झाले. ते आफ्रिकी-अमेरिकी वंशाचे होते.

क्रीडा : ९९ बेसबॉल, फुटबॉल संघाचे मालक, कृष्णवर्णीय फक्त ६

९९ लोक बेसबॉल टीम, बास्केटबॉल संघ व फुटबॉल संघाचे मालक आहेत. त्यापैकी ६ आशियाई व कृष्णवर्णीय संघांचे मालक आहेत. देशातील तीन सर्वात मोठ्या लीगचे मालकही गोरे आहेत. हे खेळाडू एनएफएल व एनबीएसाठी खेळतात.

सरकार, अर्थव्यवस्था : ३ कृष्णवर्णीय

ट्रम्प प्रशासनाचे नेतृत्व २४ लोक करतात. त्यात फक्त ३ कृष्णवर्णीय व आशियाई वंशाचे आहेत. हे लोक सरकार व अर्थव्यवस्थेशी संबंधित निर्णय घेतात. अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेतही हीच स्थिती आहे. सुप्रीम कोर्टाच्या ९ न्यायाधीशांपैकी दोन कृष्णवर्णीय आहेत.

पाेलिस दल : २५ पैकी १४ कृष्णवर्णीय, एक लष्करी पदावर

पाेलिस दलातील प्रमुख पदांवर २५ लोक नियुक्त आहेत. त्यापैकी १४ कृष्णवर्णीय आहेत. ८ पुरुष लष्करात प्रमुख पदाची सूत्रे सांभाळतात. त्यात एक कृष्णवर्णीय आहे. पोलिस दल व लष्कराच्या प्रमुख पदांवर गोऱ्यांच्या नियुक्तीवर प्रश्न निर्माण झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER