अबब! उर्वशी रौतेलाने घातला 37 कोटी रुपयांचा ड्रेस

Urwashi Rautela

एखादा ऐतिहासिक किंवा पौराणिक चित्रपट असेल तर तो खराखुरा वास्तववादी वाटावा म्हणून कलाकारांना तशा प्रकारचे कपडे तयार करून घालायला दिले जातात. एखाद्या अभिनेत्रीने राणीची भूमिका साकारली असेल तर तिचे राणीपण ठसठशीतपणे दिसावे यासाठी तिला कधी कधी खऱ्या दागिन्यांनी आणि महागड्या साड्यांनी सजवले जाते. चित्रपटाचे सेटही भव्य दिव्य पद्धतीने तयार केले जातात. त्यामुळेच अशा चित्रपटातील कलाकारांच्या कपड्यांच्या चर्चा नेहमी रंगत असतात. आता या अभिनेत्री उर्वशी रौतेलाचेही (Urvashi Rautela) नाव घ्यावे लागणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उर्वशी रौतेलाने अमातोच्या फॅशन चित्रपटात थोडा थोडका नव्हे तर 5 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजेच जवळ जवळ 37 कोटी 34 लाख रुपये खर्च (Rs 37 crore) करून तयार केलेला ड्रेस घातला आहे. आता तुम्ही म्हणाल, असे त्या ड्रेसला काय सोने, हीरो लावलेत का ज्यासाठी असे कोट्यावधी रुपये खर्च केले. तर तुमचा हा अंदाज एकदम खरा आहे. उर्वशीने या चित्रपटासाठी घातलेला ड्रेस हा चक्क खऱ्या सोन्यापासून तयार केलेला आहे. या चित्रपटात उर्वशीने इजिप्तची प्रख्यात राणी क्लियोपात्राची भूमिका साकारली आहे. त्यामुळेच उर्वशीला असा कोट्यावधींचा ड्रेस देण्यात आला आहे.

र्वशीला असेही महागडे कपडे घालण्याची खूप हौस आहे. नुकत्याच झालेल्या नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला उर्वशी गेली होती. त्यावेळी उर्वशीने घातलेला ड्रेस हा नेहाच्या ड्रेसपेक्षा महागडा होता. उर्वशीचा त्या ड्रेसवर झरदोजीचे काम करण्यात आले होते. तसेच त्यावर खरे हीरेही लावण्यात आले होते. रेणू टंडनने हा ड्रेस डिझाईन केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER