उर्वशी रौतेलाने केले २४ कॅरेट सोन्याचे मेकअप

अरब फॅशन वीक मध्ये बनली पहिली भारतीय शोस्टॉपर

Urvashi Rautela

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री उर्वशी रौतेलाने एक मोठा पराक्रम केला आहे. अरब फॅशन वीकमध्ये शोस्टॉपर बनणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. या यशाबद्दल उर्वशीचे कौतुक करून चाहते कंटाळत नाही आहे.

उर्वशी रौतेलाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात ती सिल्व्हर कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. यासह उर्वशीने भारी डायमंड ज्वेलरी परिधान केली आहे या सोबतच उर्वशीने गोल्डन शेडचा आय शॅडो लावले आहे.

उर्वशी रौतेलाने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, ‘माझ्या डोळ्यांना एक अत्यंत मौल्यवान २४ कॅरेट वास्तविक सोन्याच्या आय शॅडो लागला आहे.’

काही दिवसांपूर्वी उर्वशी रौतेला, नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगच्या लग्नात उर्वशी रौतेला पोहोचली होती. लग्नात पोहोचल्यावर तिने खूप मजा केली आणि डान्स केले होते. उर्वशीच्या डान्सचा व्हिडिओ टोनी कक्करने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

उर्वशी रौतेला अखेर व्हर्जिन भानुप्रिया या कॉमेडी ड्रामा चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अर्चना पूरन सिंग आणि गौतम गुलाटी देखील होते. सध्या उर्वशी तिच्या तेलुगू चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. काही दिवसांपूर्वी तिने आपला लूकही शेअर केला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER