भल्या मोठ्या गाऊनमुळे उर्वशी रौतेला झाली ट्रोल

Urvashi Rautela

बॉलिवूड (Bollywood) कलाकार अनेकदा असे काही करतात की त्यामुळे ते प्रचंड ट्रोल होतात. सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास कोणाला आडकाठी करता येत नसल्याने यापूर्वी अनेक कलाकार विविध कारणांमुळे ज्यात अगदी अंग प्रदर्शनापासून कपड्यांच्या विविध स्टाईलसाठी ट्रोल झालेले आहेत. या यादीत आता उर्वशी रौतेलाचेही (Urvashi Rautela) नाव घ्यावे लागेल. उर्वशीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिला लाल ड्रेसमधला एक फोटो शेअर केला आणि ती ट्रोल होऊ लागली.

यंदाचा फिल्मफेयर पुरस्कार समारंभ आसामच्या गुवाहाटीमध्ये आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार समारोहाला अनेक कलाकार हजर होते. या कार्यक्रमासाठी उर्वशीने जो ड्रेस घातला होता तो सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनला होता. आणि त्याुळेच ती ट्रोलही झाली आहे. सोशल मीडियावर शेयर केलेल्या व्हीडियोमध्ये उर्वशी एका भला मोठा घेर असलेल्या लाल ड्रेसमध्ये दिसत आहे. ‘ऑफ शोल्डर इम्बँलिश्ड बॉल गाउन’ असे त्या ड्रेसला म्हटले जाते. या ड्रेससाठी खूप जागा लागते. आणि बसल्यानंतर उर्वशी चार खुर्च्यांवर बसल्यासारखी दिसत आहे. व्हीडियोसोबत उर्वशीने लिहिले आहे की, माझ्या टीममुळेच मी या ड्रेसचा अनुभव घेत आहे. मी चार खुर्च्यांवर बसली होती.

हा व्हीडियो समोर येताच लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका खुर्चीसाठी पैसे मोजले जात असताना उर्वशीने मात्र चार खुर्च्या अडवून ठेवल्या आहेत. एकाने तर इतका मोठा आणि असला ड्रेस घालण्याची गरजच काय? असा प्रश्न केला आहे. दुसऱ्या एकाने या कपड्यांमध्ये दोन जोडी कपड़े झाले असते असे म्हटले आहे. उर्वशीने अजून तरी ट्रोलर्सना उत्तर दिलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER