राज्यपालांकडे शिफारस केल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांचा उद्या शिवसेनेत प्रवेश?

Urmila Matondkar-CM Thackeray

मुंबई :- २०१९ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) ह्या अधीकृतपणे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारांसाठी शिवसेनेने उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे मातोंडकर शिवसेनेत कधी प्रवेश करणार असा प्रश्न विचारला जात होता. मात्र उद्या त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला मातोंडकर यांचा उद्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत उर्मिला मातोंडकरांचा पक्षप्रवेश होईल, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली होती. अभिनेत्री कंगना रानौतने बॉलीवूड (Bollywood) कनेक्शनच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि शिवसेनेला लक्ष्य केले असताना उर्मिला मातोंडकर यांनी सर्वप्रथम तिच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. याशिवाय, उर्मिला मातोंडकर यांचे वक्तृत्त्व, राजकीय समज आणि राज्यपालनियुक्त सदस्यपदासाठीचे निकष पूर्ण करण्याची क्षमता लक्षात घेऊन शिवसेना त्यांना कला क्षेत्रातून विधानपरिषेदवर पाठवल्याचं म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपची भाषा आत्मसात केलेली नाही ; शिवसेना नेत्याचे वक्तव्य 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER