सहा महिन्यात कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणा-या ऊर्मिला मातोंडकर शिवसेनेतून राज्यपाल नियुक्त आमदार होणार?

Uddhav Thackeray-Urmila matondkar

मुंबई :  प्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांची विधानपरिषदेवर नियुक्ती होण्याची जोरदार चर्चा आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकीटावर मातोंडकर यांना आमदारकी मिळण्याची चिन्हं आहेत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackertay) यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर ( Urmila Matondkar)यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.

ऊर्मिला मातोंडकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा ऊर्मिलाच्या नावाची जोरदार चर्चा चालली. मात्र, सहाच महिन्यात ऊर्मिलाने कॉंग्रेसला सो़चिठ्ठी दिली. मुंबई काँग्रेसच्या भल्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अंतर्गत राजकारण सोडवण्यासाठी काँग्रेसने माझ्या प्रतिमेचा गैरवापर करुन घेतला, असा दावा करत उर्मिला मातोंडकर यांनी अवघ्या सहा महिन्यात पक्षाला सो़डचिठ्ठी दिली होती.

आता पुन्हा ऊर्मिलाच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शिवसेनेशी त्यांची जवळीक वाढली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शिवसेनेकडून उर्मिला यांची विधीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे संसदेत जाता-जाता राहिलेल्या उर्मिला विधीमंडळात प्रवेश करणार का, याची उत्सुकता आहे.

राजकारणातून आपली सेकंड इनिंग सुरु करणाऱ्या उर्मिला यांनी अकाली राजकीय एक्झिट घेतल्याची चर्चा होती. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास ‘मराठी मुलगी’ मराठी माणसाच्या अस्मितेसाठी काम करेल, अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.

उर्मिला मातोंडकर यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उर्मिला यांचे रंगीला, प्यार तुने क्या किया, भूत, कौन यासारखे असंख्य चित्रपट गाजले आहेत. उर्मिला यांच्या डान्सचेही चाहते आहेत. त्यांनी काही रिअॅलिटी शोंचं परीक्षणही केलं आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्या बॉलिवूडमध्ये फारशा दिसल्या नव्हत्या. काही वर्षांपूर्वी ‘आजोबा’ या मराठी चित्रपटात त्या झळकल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER