ऊर्मिला मातोंडकर आज शिवबंधन बांधणार? सस्पेन्स कायम

Shivsena-Urmila Martorkar

मुंबई : अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) शिवसेनेमध्ये (Shivsena) प्रवेश करणार या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांच्या उपस्थितीत ऊर्मिला मातोंडकर या शिवबंधन बांधणार असे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल अजूनही सस्पेन्स कायम आहे.

सेनेत प्रवेश करण्याआधी ऊर्मिला मातोंडकर आज पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत त्या त्यांची पुढील राजकीय वाटचाल कशी आणि कोणत्या राजकीय पक्षातून असेल या संदर्भात त्या माहिती देतील .

ऊर्मिला यांच्या शिवसेनेच्या पक्षप्रवेशावरून संभम्र निर्माण झाले आहे. ऊर्मिला यांनी आपण शिवसेनेत पक्षप्रवेश करणार नाही, अशी प्रतिक्रिया एका वृत्तपत्राला दिली . इतकेच नाही तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि मंत्री अनिल परब यांनीही ‘कदाचित’ शब्दावर जोर देऊन ऊर्मिला सेनेत प्रवेश करतील, असे म्हटलं आहे. त्यामुळे ऊर्मिला काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

दरम्यान शिवसेनेने या आधीच त्यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत समावेश केले आहे. त्यामुळे राज्यपालांची मंजुरी मिळताच त्या विधान परिषदेत शिवसेनेच्या आमदार म्हणून आपली राजकिय कारकीर्द सुरू करणार आहेत.

ही बातमी पण वाचा : शिवसेना प्रवेश : उर्मिला मातोंडकरने दिला नकार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER