त्यांची एवढी हिंमत कशी? ; शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर रामदेव बाबांवर संतापल्या

Maharashtra Today

मुंबई :- शिवसेना नेता उर्मिला मातोंडकरने रामदेव बाबांना सोशल मीडियावरून (Social Media) फटकारले आहे. उर्मिलाने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट पोस्ट केलंय. कुणीतरी या बिझनेसमनला एखाद्या कोविड रुग्णालयात जायला सांगा. तिथे आपल्या डॉक्टर, फ्रंटलाइन वर्कर्ससोबत २४ तास उभं रहा आणि मग ही टरटर करा. हे सर्वात अमानुष, क्रोधास्पद आणि घृणास्पद आहे. हे कुणाचे टूलकिट आहेत? त्यांची एवढी हिंमत कशी झाली? असे म्हणत उर्मिलाने रामदेव यांच्यावर थेट निशाणा साधला (Urmila matondkar slams baba ramdev) आहे.

ही बातमी पण वाचा : डॉक्टरांची टिंगल : बाबा रामदेव यांच्यावर तातडीने कारवाई करा; IMA चे उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

उर्मिलाच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी समर्थन दर्शवलं आहे. एक युजर म्हणाला, “उर्मिलाजी तुम्ही बरोबर आहात. हे बनावटी बाबा आहेत.”. उर्मिला सोबतच अभिनेत्री तापसी पन्नीने देखील एक ट्विट करत रामदेव यांच्यावर निशाणा साधला होता.

दरम्यान अ‍ॅलोपॅथीच्या (Allopathy) विधानावरून रामदेव यांनी सोमवारी आपली चूक कबूल केली. व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केलेला मेसेज वाचून केलेले “अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे” हे विधान आपण मागे घेतल्याचं रामदेव यांनी जाहीर केलं. रामदेव यांचा एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले .

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button