वाचाळांमध्ये कृतीतून बोलणारा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे : उर्मिला मातोंडकर

मुंबई :- सध्याच्या वाचाळ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे कमी बोलून कृतीवर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. लॉकडाऊनदरम्यान (Lockdown) मंदिरे सुरू करण्यासंदर्भात मागणी होत होती. मात्र त्यावेळी धर्म म्हणजे केवळ मंदिर नाही, अशा प्रकारे परिस्थिती उद्धव ठाकरेंनी हाताळली, असे वक्तव्य शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी केले आहे .

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray birth anniversary) यांच्या जयंतीनिमित्त आज शिवाजी पार्कवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात खासदार संजय राऊत (Sanjay raut) आणि उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी हजेरी लावली. यावेळी त्या बोलत होत्या . बाळासाहेबांमुळे बॉलिवूड सुरक्षित होते, असे उर्मिला म्हणाल्या.

आज मी शिवसेनेचा हिस्सा आहे. मात्र बाळासाहेबांबाबत नेहमीच आदर होता. बाळासाहेब ‘मातोश्री’त होते म्हणून चित्रपटसृष्टी सुरक्षित होती. आमच्याकरिता बाळासाहेब आणि त्यांचे विचार अजूनही तसेच आहेत, असे उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

ही बातमी पण वाचा : ‘जिथे अन्याय, तिथे शिवसेना’ : ऊर्मिला मातोंडकर   

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER