उर्मिला मातोंडकर यांनी नाकारली काँग्रेसची ऑफर, विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट

Urmila matondkar-Vijay wadettiwar

नागपूर : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila matondkar) यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसनेही त्यांना विधान परिषदेसाठीऑफर दिली होती. मात्र त्यांनी राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचं सांगत नकार दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी केला.

टीव्ही 9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला. आम्ही उर्मिला मातोंडकर यांच्याशी संपर्क साधून विधान परिषदेवर जाण्याची ऑफर दिली होती. पण त्यांनी नकार दिला. राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचं त्यांनी सांगितलं. आता जर त्यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली असेल तर त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. उर्मिला मातोंडकर आमच्या लोकसभेच्या उमेदवार होत्या. त्या मराठी असून त्यांनी कंगना रनौतच्या विरोधात घेतलेल्या भुमिकेमुळे त्यांना विधानपरिषदेवर घ्यावं असं शिवसेनेला वाटणं स्वाभाविक आहे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

निधी वाटपावरून अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर त्यांना विचारलं असता अशोक चव्हाण यांचं भाषण मी ऐकलं नाही. पण मध्यंतरी निधी कमी मिळाला होता. तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला होता. त्यानंतर सर्वांना समान निधी मिळाला, असं सांगतानाच सरकारमध्ये कोणतीही कुरबूर नाही. ज्यांनी देव पाण्यात बुडवून ठेवले त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही, असंही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेची उर्मिला मातोंडकर यांनाच का पसंती?; ‘हे’ आहे कारण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER