
मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. राज्यातील महाविकास आघाडी (MVA) सरकारनं त्यांची राज्यपाल कोट्यातील विधान परिषदेच्या आमदार म्हणून शिफारसही केली आहे. उर्मिला यांनी आपल्या नव्या इनिंगची सुरुवात केली असून मुंबईतील खार भागात एक आलिशान ऑफिस खरेदी केले आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार , उर्मिला यांनी खार पश्चिममध्ये (Khar West) लिंकिंग रोडला आलिशान ऑफिस खरेदी केले असून या ऑफिसची किंमत ३ कोटी ७५ लाख रुपये इतकी आहे. लिंकिंग रोडवरील ‘दुर्गा चेंबर्स’ या सात मजली इमारतीमध्ये त्यांनी हे ऑफिस खरेदी केले आहे. या इमारतीचा तळमजला हा व्यावसायिक वापरासाठी आहे. तर वरील मजल्यांवरील ऑफिसचे दरमहा भाडे ५ ते ८ लाख रुपये आहे.
उर्मिला यांनी या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील ९६.६१ चौरस मीटर म्हणजेच १०३९.९०१ चौरस फूट ऑफिस खरेदी केले आहे. उर्मिला यांनी या ऑफिसच्या प्रत्येक चौरस फुटासाठी ३६ हजार रुपये मोजले आहेत. राजेश कुमार या व्यावसायिकाकडून त्यांनी हे ऑफिस खरेदी केले आहे. या ऑफिसच्या खरेदीची प्रक्रिया २८ डिसेंबरला झाल्याची माहिती आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला