काँग्रेसकडून लढताना वाचलेला निधी उर्मिलाकडून मुख्यमंत्री फंडात

मुंबई :- काँग्रेसकडून (Congress) लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) लढल्यानंतर शिल्लक राहिलेला निधी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. उर्मिला यांनी २० लाख रुपयांचा उरलेला निधी मुख्यमंत्री फंडात दिला असून हा निधी देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची परवानगी घेतली आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये असताना 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. काँग्रेसने लोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना फंड दिला होता. उर्मिला मातोंडकर यांनाही 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. मात्र, त्यातील त्यांनी फक्त 30 लाख रुपये खर्च केले होते. त्याचा हिशोबही त्यांनी निवडणूक आयोगाला वेळोवेळी दिला होता.

निवडणुकीत 30 लाख रुपये खर्च झाल्यानंतर 20 लाखांचा निधी शिल्लक राहिलेला होता. त्यातच राज्यात कोरोनाचं संकट उद्भवलं. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्याने सर्वच उद्योगधंदे बंद झाले होते. त्याचा राज्याला मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे त्यांनी हा 20 लाखांचा उरलेला निधी मुख्यमंत्री निधीत देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना फोन करून हा निधी सीएम फंडात देण्याची परवानगी मागितली होती. थोरात यांनीही त्यांना हा निधी सीएम फंडात देण्याची परवानगी दिली. त्यामुळे त्यांनी हा निधी सीएम फंडात देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER