महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, मुंबईने… ; उर्मिला मातोंडकरांनी कंगणाला फटकारले

Kangana Ranaut - Urmila Matondkar

मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra) भारताचा (Indian) सांस्कृतिक आणि बौद्धिक चेहरा आहे. महान छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) भूमी आहे. मुंबईने (Mumbai) कोट्यवधी भारतीयांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली आहे, तसेच त्यांना नावही दिलं आहे. त्यामुळे केवळ कृतघ्न लोकच तिची तुलना पीओकेशी करू शकतात, असे म्हणत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी कंगणाला फटकारले आहे .

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतने (Kangana Ranaut) शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते , असे म्हटले होते . कंगणाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर सर्व स्तरावरून टीका होत आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER