काँग्रेसचे उरलेले पैसे ऊर्मिलाने दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीत

Urmila Matondkar.jpg

अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी अलिकडेच शिवबंधन बांधले. म्हणजे अर्थातच शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून त्यांच्या नावाची शिफारस शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे केली. अद्याप १२ नावांबाबत राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ऊर्मिला आमदार होणार की नाही या बाबत अस्पष्टता आहे. आता ऊर्मिला यांचा एक वेगळाच निर्णय चर्चेत आला आहे.

ऊर्मिला यांनी २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक उत्तर मुंबई मतदारसंघात लढविली होती. त्यावेळी त्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या. ऊर्मिला यांनी त्या निवडणुकीत चांगली हवा तयार केली. त्यामुळे भाजपचे गोपाळ शेट्टी अडचणीत असल्याचे बोलले जात होते. प्रत्यक्ष निकालात मात्र मातोंडकर यांचा दारूण पराभव झाला होता. शेट्टी तब्बल ४ लाख ६५ हजाराच्या मताधिक्याने जिंकले. त्यानंतर ऊर्मिला यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांबाबत नाराजीदेखील व्यक्त केली होती. नंतर त्या फारशा चर्चेत राहिल्या नाहीत. अचानक त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि मग शिवसेनेने त्यांना आमदारकी देऊ केली. वर्षानुवर्षे निष्ठेने काम करणाºयांना संधी देण्याऐवजी ऊर्मिलासारख्या उपºया लोकांना संधी मिळाली म्हणून शिवसेनेत नाराजी आजही आहेच पण कोणी बोलून दाखवत नाही एवढेच.

लोकसभा निवडणुकीत खर्चासाठी काँग्रेस पक्षाकडून ऊर्मिला यांना ५० लाख रुपये मिळाले होते. त्यातील ३० लाख रुपयेच खर्च झाले. २० लाख रुपये शिल्लक राहिले. आता या २० लाखांचे काय करायचे हा प्रश्न ऊर्मिला यांना पडला. त्यांच्या सीएने म्हणे या २० लाख रुपयांचे काय करायचे अशी विचारणा केली. मग ऊर्मिला यांनी ते २० लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत द्यायचे ठरविले. त्यांचे पती मोहसीन अख्तर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दावा केला की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची परवानगी घेऊनच ऊर्मिलाने ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिली. तेव्हाही ऊर्मिला या काँग्रेस पक्षातच होत्या.

यातून काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. काँग्रेस पक्षाने दिलेला निधी शिल्लक राहिला तर तो पक्षाला परत करण्याचे शहाणपण ऊर्मिला यांनी का दाखविले नाही. आज काँग्रेसची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. काँग्रेसच्या कार्यकर्ते, नेत्यांनी पक्षाला आर्थिक मदत द्यावी असे आवाहन करण्याची पाळी पक्षावर मागे आलेली होती. अशा परिस्थितीत मातोंडकर यांनी मात्र पक्षाचा शिल्लक निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिल्याबद्दल आणि त्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी परवानगी दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER