‘नगरी पॅटर्न राम शिंदेंना विखेंचा झटका ; पवारांसोबत आतून युती, ‘खास’ माणसासाठी पक्ष टांगणीला?

Ram Shinde - Rohit Pawar

नगर :- नगरच्या राजकरणात राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे खंदे समर्थक जगन्नाथ राळेभात यांच्या घरात पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे संचालकपद येत आहे. विखेसमर्थक असलेल्या राळेभात यांचा बिनविरोध संचालकपदाचा मार्ग राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यामुळे सोपा झाला आहे. विखे-पवारांच्या ऐनवेळीच्या छुप्या युतीने माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) बॅकफूटला गेले असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे .

माजी मंत्री राम शिंदे हे राळेभात यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत होते. परंतु राजकारणात कनेक्ट महत्त्वाचा म्हणतात तो यासाठीच… राम शिंदेंचा राळेभात यांच्याशी कनेक्ट कमी पडला आणि आणि ‘बिनविरोध’ निकालाचा चेंडू आमदार पवार यांनी स्वतःच्या कोर्टातून टोलवला.

जामखेड तालुका सोसायटी मतदारसंघातून जगन्नाथ राळेभात आणि त्यांचे पूत्र अमोल यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आमदार पवारांनी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांना निवडणूक रिंगणात उतरविले. भोसलेंच्या उमेदवारीने निवडणुकीतील चुरस वाढली. सुरुवातीला राळेभात पिता-पुत्रांपैकी एकच अर्ज राहून बिनविरोध निवडणूक होईल, असे चित्र निर्माण झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER