‘UPSC’ची प्रिलिमिनरी लांबणीवर; २७ जूनऐवजी १० ऑक्टोबरला होणार परीक्षा

देशात सध्या कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचे संकट निर्माण झालेले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी अनेक राज्यांत लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे. दिवसेंदिवस नवीन रुग्ण आढळून येत आहेत. मृत्युसंख्येतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता केंद्रीय लोकसेवा आयोगानेदेखील २७ जून रोजी होणारी ‘नागरी सेवा पूर्वपरीक्षा’ (UPSC’s preliminary examination) पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आता १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.

या संदर्भात UPSC’च्या अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशनदेखील टाकण्यात आले आहे. UPSC नागरी सेवा परीक्षा-२०२१ आणि भारतीय वन सेवा परीक्षा-२०२१ साठी २४ मार्चपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button