पवारांना करणार यूपीएचे चेअरमन; चर्चेत काही तथ्य नाही- तारीक अन्वर

Tariq Anwar & Sharad Pawar

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) चेअरमन होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते तारीक अन्वर या प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले- या चर्चेत काही तथ्य नाही.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना अन्वर (Tariq Anwar) म्हणालेत, जाणूनबुजून अशा गोष्टी पेरल्या जात आहेत. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून या वावड्या उठवण्यात आल्या आहेत. या बातमीचा वास्तवाशी काहीच संबंध नाही. काहीच तथ्य नाही.

यूपीएचा अध्यक्ष काँग्रेसचाच असेल
यूपीएचा अध्यक्ष सर्वांत मोठ्या पक्षातूनच होत असतो. काँग्रेस जेव्हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला होता, तेव्हा यूपीएची स्थापना झाली होती. आजही काँग्रेसच सर्वांत मोठा विरोधी पक्ष आहे. विरोधी पक्षात काँग्रेसकडे सर्वाधिक खासदार आहेत. त्यामुळे यूपीएचा अध्यक्षही काँग्रेसमधूनच होईल. ज्या पद्धतीने बातम्या सुरू आहेत, त्या आम्ही नाकारत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER