युपी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने स्विकारली 5 एकर जमीन, मशीदीऐवजी बनणार शिक्षण संस्था

UP Sunni Central Waqf board accepted 5 acre land, instead of Mosque will be eductaion institute

 नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एकीकडे राम मंदीराच्या उभारणीसाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सुन्नी वक्फ बोर्डाला जमीन देण्याच्या प्रस्तावालाही उत्तर प्रदेश सरकारने कॅबिनेटमध्ये मंजूरी देण्यात आली आहे. अयोध्या येथील सोहावल तालुक्यातील धन्नीपूर गावात सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

अयोध्या प्रशासनातील उच्चपदस्थ सूत्रांनुसार धन्नीपूर येथे सुन्नी बोर्डाला मशिदीसाठी दिलेली जमीन पंसत आली आहे. सुन्नी वक्फ बोर्डाने अयोध्येच्या घन्नीपूर येथे मशिदीसाठी प्रस्तावीत जमीनीची मंजूरी करून घेतली आहे. सुन्नी बोर्डाच्या सुत्रांचे मानले तर या 5 एकर जमीनीवर ते लोक मशिदीऐवजी शिक्षण संस्था स्थापन करतील. सोबतच हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेली संस्थेचे निर्माण केले जाईल.

उत्तर प्रदेशातील सुन्नी वक्फ बोर्डाच्या सुत्रांचे म्हणणे आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जमीन ही त्यांना सरकारकडून दिली जाणार आहे. यात त्यांच्या पसंतीचा कुठलाही पर्याय नाही आहे. परंतू प्रस्तावीत जमीन फारच चांगली आहे. सुन्नी वक्फ बोर्डाचे नेहमी असे मानने आहे की ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्विकारतील. यासाठी बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका किंवा क्युरेटिव्ह याचिका दाखल केलेली नाही.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालवाच्या आदेशाचे पालन करताना सुन्नी वक्फ बोर्डाने जमीनीचा स्विकार केला आहे. वस्तुत: उत्तर प्रदेश सरकारने मशिदीसाठी अयोध्येच्या सीमेच्या आतच धन्नीपूर गावांत जमीन देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.