मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अक्षय कुमारसोबत बैठक; उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारण्याबाबत चर्चा

Yogi Adityanath - Akshay Kumar

मुंबई : उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. योगी मंगळवारी (1 डिसेंबर) संध्याकाळी मुंबईत दाखल होताच त्यांनी अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये झाली भेट घेतली.

योगी आदित्यनाथ यांनी अक्षय कुमार सोबत उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्ध नगर येथील यमुना एक्सप्रेस वे जवळ तयार होणाऱ्या फिल्मसिटीबाबत चर्चा केली. योगी यांनी अक्षय कुमारची भेट घेतल्यानंतर ट्विटरवर या भेटीबाबत माहिती दिली.

आज मुंबईत भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार यांची भेट घेतली. चित्रपटसृष्टीतील विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांचा कामातील ध्यास तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER